Breadcrumb

Objective Electrical for MAHAGENCO Recruitment Exam 2024 | Marathi Edition

Objective Electrical for MAHAGENCO Recruitment Exam 2024 | Marathi Edition

(0 Reviews)
 • ISBN : 9789358702606
 • Pages : 260
 • Binding : Paperback
 • Language : Marathi
 • Imprint : S Chand Publishing
 • © year : 2024
 • Size : 8”x10.5”

Price : 325.00 260.00

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थी मित्रांच्या हाती "तांत्रिक माहिती (इलेक्ट्रिकल)" हे पुस्तक देताना मला अतिशय आनंद होत आहे. सदर पुस्तक महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती अंतर्गत "विद्युत सहाय्यक" (टेक्निशियन) पदासाठी अत्यंत उपयोगी आहे.सदर पुस्तक लिहिण्यासाठी मी विविध संदर्भ पुस्तके तसेच महत्त्वाचे व संपूर्ण भारतभर झालेल्या इलेक्ट्रिकल च्या विविध टेक्निकल पेपरचे अवलोकन करून परिपूर्ण पुस्तक तयार करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या पुस्तकात MSEB एक्झाम साठी लागणारा किंवा विद्युत सहाय्यक या पदासाठी लागणारा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे व अति महत्त्वाचे TheoryMCQ सुद्धा दिले आहेत. हे पुस्तक प्रामाणिकपणे वाचून व त्याचे रिविजन केल्यास तुम्हाला वरील परीक्षेत हमखास यश मिळेल.विद्यार्थी मित्रांच्या उज्वल भविष्यासाठी हे पुस्तक फार उपयुक्त ठरेल. हे पुस्तक मी माझे आई-वडील सौ उमा व श्रीकृष्णराव गाडगे यांना समर्पित करत आहे. हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा माझे मित्र श्री आशिष ठेंगरे संचालक AR Education, नागपूर यांच्याकडून मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुस्तक लिहिताना वेळोवेळी सहकार्य करणारी माझी पत्नी सौ अपर्णा व तसेच लिखाणातील त्रुटी दूर करण्यास व लिखाणास मदत केल्याबद्दल माझी बहीण कुमारी भाग्यश्री हिचाही मी ऋणी राहील.तसेच माझे मित्र आदित्य लेंडे, शिवानी कांबळे व भावना भलवी यांचे विशेष आभार तसेच S. Chand सारख्या एका नामांकित प्रकाशनासोबत जुळण्याचा योग घडून आला याबद्दल मी श्री. निरंजन बघेल सर तसेच S. Chand प्रकाशनाचा सदैव आभारी राहील. सदर पुस्तक लिहिताना अनावधानाने काही चुका झाल्या असल्यास त्याबद्दल संभाव्य चुका शोधून पुढील आवृत्तीत सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

पुस्तकाची वैशिष्ट्ये :
 
 • विस्तृत व तपशिलवार विषयविवेचन
 • वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी सराव प्रश्नांचा समावेश
 • विधुत सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ - ३ पदांसाठी ITI पातळीवरील संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश
 • तांत्रिक महितीशी निगडित गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकेतिल प्रश्नांचा समावेश
 • परिक्षेत विचारल्या जाऊ शकणाया अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश

MSEB MAHAGENCO Technician Recruitment 2024

Be the first one to review

Submit Your Review

Your email address will not be published.

Your rating for this book :

Sign Up for Newsletter