
Author : Vivek Singh
Price : 699.00 559.20
भारताच्या अर्थव्यवस्थेवर आधारित हे पुस्तक UPSC तसेच राज्यस्तरीय MPSC व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी एक संपूर्ण मार्गदर्शक ठरेल. परीक्षेच्या दृष्टीने स्थिर व संकल्पनात्मक विषयांसह चालू आर्थिक घडामोडींचा समतोल साधत सखोल समज विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 2024-25 च्या आर्थिक पाहणी व 2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा समावेश केल्यामुळे हे पुस्तक अद्ययावत व परीक्षेस उपयुक्त आहे.
संपूर्ण अभ्यासक्रमाचा सखोल आढावा घेण्यासाठी पुस्तकात सोप्या भाषेत मूलभूत संकल्पनांचे स्पष्टीकरण दिले आहे. नकाशे, आलेख, प्रवाहचित्रे आणि उदाहरणे यांचा उपयोग करून संकल्पनांचे स्पष्टीकरण स्पष्ट व सहजसाध्य केले आहे. हे पुस्तक फक्त UPSC परीक्षेसाठीच नव्हे, तर राज्यसेवा (MPSC), गट-ब व गट-क संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच इतर विभागीय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. रिझर्व्ह बँक (RBI), नाबार्ड (NABARD), आणि सेबी (SEBI) परीक्षांच्या अभ्यासक्रमाचा विचार करून हे पुस्तक विकसित करण्यात आले आहे, त्यामुळे अर्थशास्त्राशी संबंधित विविध परीक्षांसाठी हे मार्गदर्शक ठरेल.
याशिवाय, पुस्तकात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर स्वतंत्र प्रकरण देण्यात आले आहे, जे राज्यस्तरीय परीक्षांसाठी विशेषतः उपयुक्त ठरेल. महत्त्वाच्या संकल्पना ठळक अक्षरात देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे जलद पुनरावलोकन शक्य होते.
ही सुधारित आवृत्ती विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या मागणीनुसार विकसित करण्यात आली आहे. हे पुस्तक तुमच्या यशाच्या मार्गावर विश्वासार्ह साथीदार ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे.पुस्तकाची वैशिष्ट्ये:
🔹 केंद्र शासनाच्या 2025 26 च्या अंदाजपत्रकाचा समावेश आणि 2024 25 च्या आर्थिक पाहणीचा समावेश
🔹 अद्ययावत सांख्यिकी आकडेवारीचा समावेश
🔹 मागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा समावेश
🔹 रिझर्व्ह बँक, नाबार्ड, सेबीच्या अहवालांचा समावेश
🔹 परीक्षेभिमुक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश
🔹 महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा समावेश
खालील परीक्षांसाठी उपयुक्त,
📌 राजपत्रित नागरी सेवा पूर्व व मुख्य परीक्षा
📌 अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा
📌 इतर विभागीय स्पर्धा परीक्षा
📌 महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या परीक्षांसाठी उपयुक्त
Be the first one to review
Your email address will not be published.
Your rating for this book :
S.Chand And Company Limited
Ground Floor, B1/D1, Mohan Cooperative Industrial Estate, Mathura Road, New Delhi - 110044
1800 1031 926
Higher Education: 7678396675
Higher Education: 7678396675